अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकाल आज म्हणजेच 21 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आलाय. त्यात होली फेथ कॉमर्स जूनियर कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला.
त्यात कु. श्रमिका अनिल येसनसुरे (95.50%) गुण प्राप्त करून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे . तसेच कार्तिक सुनील मगरे ने (90.50%) द्वितीय क्रमांक तर अब्दुल्ला शोहेब हुसेन ने (90.50%) घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला आणि त्यांच्या मागोमाग कु. प्रणाली हिम्मत सिंग बैस ने (83.17%) घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे सचिव श्री जेम्स सॅम्युअल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका बिना म्यॅथुल आणि शिक्षक वृंद यांना दिले.

