अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- प्रोग्रेसिव्ह ऐज्युकेशन सोसायटी हिंगणघाट द्वारा संचालित एसएसएम विद्यालय हिंगणघाटचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च – 2024 चा निकाल 89.06 टक्के लागलेला असून एकूण 270 पैकी 256 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्राविण्य श्रेणी मध्ये 32 विद्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये 68 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी मध्ये 75 विद्यार्थी, तृतीय श्रेणी मध्ये 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यापैकी उच्च गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कु. गौरी गजानन मेले 92.60 टक्के, कु. संपदा विजय ब्रम्हे 91.20 टक्के, कु. धनश्री जीवन दलाल 88.20 टक्के, कु. रुचिता नारायण लाकडे 88.00 टक्के, प्रतीक धोंडबाजी घुडे 87.20 टक्के, कु. पलक जीवन पत्रकार 87.00 टक्के, चैतन्य राजू देवगडे 87.00 टक्के असे घवघवीत यश प्राप्त करून विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष गो. गो. राठी, उपाध्यक्ष श्या. भा. भीमनवार, सचिव र. गं. धारकर, सहसचिव सं. श्री. देशपांडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक चं. ज्ञा. खडतकर, उपमुख्याध्यापिका सौ. कि. र. मद्दलवार, पर्यवेक्षक ई. शं. चंदनखेडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग समाज तील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक आणि पालकांना दिले.

