युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
रामटेक:- येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषदच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पर्वावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती निमित्त लोककला उत्साह सोहळा देशमुख सेलिब्रेशन हॉल रामटेक येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री सुनील बाबू केदार हे होते, तर कार्यक्रमाचे उदघाटक रामटेक क्षेत्राचे आमदार आशिष बाबू जयस्वाल हे होते तर प्रमुख अतिथी पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांतर्फे दीप प्रज्वलित करण्यात आली. यानंतर प्रस्ताविक विदर्भ शाहीर कलाकार पण परिषदचे अध्यक्ष मनीष भिवगडे यांनी केले. याप्रसंगी शाहीरांचा सत्कार करण्यात आला. श्रीराम मेश्राम, अंबादास नागदेवे, चुडामनजी लांजेवार, यादवराव कानोलकर, नाना तायवाडे, विजय चकोले, मनोहर धनगरे, रामेश्वर दंडारे, अरुण वाहने पुरुषोत्तम कुंभे, ज्ञानेश्वर गावंडे, निशाताई खडसे, उर्मिलाताई वाडी, प्रभाताई निंबाळकर यांना शील्ड , शाल व पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यात पाच शाहीर मंडळ, सहा दंडार , चार भारुड, दोन नृत्यगीत व 113 भजन मंडळांनी सहभाग घेतला नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातील कलावंतांनी आपली कला दर्शवली. सर्वात खास म्हणजे गोंडी नृत्य हे कार्यक्रमाचं विशेष आकर्षण राहिलं.
कार्यक्रमाचे संचालन विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वीते करिता विद्याताई लंगडे, अरुण वाहने, राहुल लांजेवार, सुधीर लांजेवार, भाऊराव खोबरे यांनी अथक परिश्रम घेतले.

