अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- लोकसभा निवडणुकीत विदर्भात भारतीय जनता पक्षाची दाणादाण उडाली आहे. यात नागपुर ग्रामीण रामटेक लोकसभा क्षेत्रातून भाजपचा सुपडा साफ झाला असून काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांनी शिवसेना (शिंदे) गटाचे उमेदवार राजू पारवे यांचा ७२७५४ मताने पराजय केला आहे. श्यामकुमार बर्वे यांच्या विजयी जल्लोष सावनेर येथे पाहायला मिळाला.
यावेळेस काँग्रेस पदाधिकारी, शिवसेना (उबाठा) पदाधिकारी, राष्ट्रवादी शरद पवार गट पदाधिकारी, आम आदमी पार्टी पदाधिकारी, सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत गुलाल उधळण व फटाक्याची आतिषबाजी केली. नंतर बस स्टॅन्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत गुलाल व फटाक्याची आतिषबाजी करीत काँग्रेस जिंदाबाद चे नारे लावण्यात आले.

