अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक “हिट अँड रन” अपघाताची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र 44 वरील राणा धाब्या समोर फॉरच्युणरने ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोचालक जागीच ठार झाला आहे.
ऑटो क्र MH 32 AK1653 चा चालक सुमीत ईश्वर कांबळे वय 40 वर्ष हा हिंगणघाटकडे महामार्गावरुन राँग साईट जात असतांना सदर वेळी हिंगणघाट कडुन नागपुर कडे जाणाऱ्या फॉरच्युणर वाहन क्र TS-21 M-1999 चे वाहन चालक नामे बि. साईकुमार वय 28 रा. जिगी पीयान तेलंगणा यांने ताब्यातील वाहन भरधावे वेगाने व निष्काळजीपणे चालवित जोरदार धडक दिल्याने ऑटो चालकाचा जागीच मृत्यु झाला.
या घटनेची माहिती महामार्ग पोलीस व स्थानीक पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ऑटोमध्ये फसलेल्या मृतकास व फॉरच्युणर वाहना मध्ये फसलेल्या प्रवाश्यांना महामार्ग पोलीस व हिंगणघाट पोलीस स्टॉफच्या मदतीने तात्काळ वाहनातुन बाहेर काढण्यात आले आणि लगेच महामार्गाच्या आम्बुलन्सच्या सहाय्याने उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.
या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतुक बंद पडली होती. महामार्ग पोलीस, स्थानीक पोलीस व महामार्ग पेट्रोलींग वाहन 1033 चे मदतीने अपघात ग्रस्त वाहन सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यात आले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. सदर कार्यवाही प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस मदत केंद्र जाम सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट ठाणेदार मुंडे, पीएसआय मिश्रा, पोलीस पोलीस अंमलदार गजानन राऊत, अशोक भोगे, सुनील श्रीनाथे, विकास काकडे, चंद्रकात जिवतोडे, दिपक जाधव व स्थानीक पोलीस यांनी पार पाडली.

