विठ्ठल ठोंबरे, शिर्डी / राहता तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राहता:- राहता तालुक्यातील नांदूर ममदापुर शिवरस्त्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून रहिवासी असलेले लोंढे कुटुंब शेती गट क्र.२७/३ मधील लोंढे यांच्या बंद घराचे अज्ञात चोरट्यानीं कलूप तोडून आठ ते नऊ तोळे सोने सह रोख रक्कम असा मुद्देमाल गायब केल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नांदूर मधील लोंढे कुटुंब हे आपल्या शेतामध्ये वस्ती करुन राहतात. दि.३ जुन २०२४ रोजी अजय लोंढे व त्यांची पत्नी, मुले आपल्या एका खोलीला कुलूप लावून दुसऱ्या खोलीत झोपले होते.पहाटेच्या सुमारास पाळत ठेऊन असलेल्या चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडुन खोली मध्ये प्रवेश केला.संपूर्ण खोलीची उलथापालथ करुन कपाटामध्ये ठेवलेला ५१ हजार रुपयांच्या सोन्याच्या 3 चैन, ३६ हजाराचे कानातील,६० रुपये किमतीचे सोन्याचे गंठण,१५ रुपये किमतीचे सोन्याच्या ठुशी,४८ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, ३ हजाराच्या चांदीच्या वाट्या,१५ हजार रु.किमतीच्या कानातील साखळ्या,काही रोख रक्कम २ लाख २८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे मध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरी पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोळंके करत आहे.

