Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

वर्धा: इंदिरा गांधी पुतळ्याच्या सौंदर्यीकरन व विद्युत रोषणाईच्या नावावर विकास कामांच्या नावावर भ्रष्टाचार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 15, 2024
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा: इंदिरा गांधी पुतळ्याच्या सौंदर्यीकरन व विद्युत रोषणाईच्या नावावर विकास कामांच्या नावावर भ्रष्टाचार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जवळपास तीन महिन्यांपूर्वी आरती चौक वर्धा येथील स्वर्गीय इंदिरा गांधी पुतळ्याच्या आतील परिसरात पन्नास लाख रुपये खर्च करून एक कृत्रिम शो लाईट लावण्यात आला असून तीन महिन्यापासून तो तसाच बंद स्थितीत आहेत त्यादरम्यान सदर ठिकाणी फार जुने असलेले कडुनिंबाचे मोठे झाडं सुद्धा पूर्णता मुळासकट कापण्यात आले मात्र सदर ठिकाणी लावण्यात आलेला कृत्रिम शो लाईट आज ही कायमचा बंद आहेत आणि सदर लाईट सुरू करण्यापूर्वी तेथील फार वर्षांपूर्वी पासूनचा सुरू असलेला मोठा हायमास्ट लाईट मात्र पूर्णता मुळासकट काढण्यात आला आणि अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले ही बाब विकासाच्या दृष्टीने योग्य आहेत का? याला काय म्हणावं विकास म्हणावं की विकासाच्या नावावर कमिशन खाण्याचा धंदा म्हणावा या सर्व बाबींचा आपणच सखोल अभ्यास करावा.

वरील प्रकारातून दुसरी एक बाब लक्षात येते ती म्हणजे धुनिवाले चौक ते दत्तपुर टी पॉईंट पर्यंत रस्त्याच्या मध्यभागी लाखो रुपये खर्च करून स्ट्रीट लाईट लावण्यात आले असून आज तीन वर्षापेक्षा जास्त काळ लोटला अजूनही सदर मार्गावरील स्ट्रीट लाईट अद्यापही सुरू झाले नाही सदर मार्गावर मोठमोठे मंगल कार्यालय आहे. वर्धेकरांना शुभकार्यासाठी त्या मार्गावरून नेहमी सतत ये जा करावे लागते सदर मार्गावर स्ट्रीट लाईट लावूनही एकही स्ट्रीट लाईट सुरू नसल्याने समस्त वर्धेकरांना अंधारातूनच ये जा करावे लागते ही फार मोठी शोकांतिका आहेत.

स्वर्गीय इंदिरा गांधी पुतळ्याचे भव्य दिव्य स्वरूपात सौंदर्यीकरण करावे व स्वर्गीय इंदिरा गांधी पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी कायमस्वरूपी शिडी ची व्यवस्था करावी याबाबत सुदामपुरी प्रभाग क्रमांक 4 येथील सत्ताधारी भाजपच्या महिला नगरसेविका सौ रंजना सुरेश पट्टेवार व ज्येष्ठ समाजसेवक तथा शिवा संघटनेचे वर्धा जिल्हा प्रमुख श्री सुरेश पट्टेवार अशाप्रकारे आम्ही पट्टेवार दाम्पत्यांनी सतत वर्धा नगर पालिकेकडे पाठपुरावा केला परंतु वरीलप्रमाणे अतिमहत्वाच्या विषयावर अद्यापही ठोस निर्णय घेण्यात आला नाही हे विशेष

वरील प्रमाणे विकासाच्या नांवावर झालेला प्रचंड भ्रष्टाचार लक्षात घेता वर्धेचे जिल्हाधिकारी यांनी कुठलाही पक्षपात न करता वरील सार्वजनिक विषयावर विशेष लक्ष केंद्रित करावे व जनतेच्या पैशाची होत असलेली लूट थांबविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहून वरील प्रकाराची चौकशी करावी व समस्त वर्धेकरांना न्याय द्यावा असे या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

जवळपास तीन वर्षांपूर्वी धुनिवाले चौक ते दत्तपुर टी पॉईंट पर्यंत लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट अद्यापही बंद का? तसेच आरती चौकातील स्वर्गीय इंदिरा गांधी पुतळ्या समोर मागील अनेक वर्षांपासून लावण्यात आलेला मोठा हायमास्ट लाईट मनमर्जी ने परस्पर काढून टाकण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती का? तसेच रस्त्याच्या बांध कामात अनेक ठिकाणी अडथळा निर्माण करणारे मोठं मोठे विशाल वृक्ष कुठलीही परवानगी न घेता पूर्णता मुळासकट कापण्यात येते हा काय प्रकार आहे अलीकडे तर नवीन नियमाप्रमाणे कुठलेही वृक्ष मुळासकट कापण्यासाठी 30 ठिकाणा वरून परवानग्या प्राप्त कराव्या लागते असा नवीन नियम असतांना आरती चौकातील स्वर्गीय इंदिरा गांधी पुतळ्या समोरील मोठे विशाल कडू निंबाचे वृक्ष पूर्णता मुळासकट कापण्यात आले त्याची रीतसर परवानगी घेण्यात आली होती का?याचाही विचार करणे गरजेचे आहे.

5 जुन विश्व पर्यावरण दिवस असल्याने त्या दिवशी आरती चौकातील स्वर्गीय इंदिरा गांधी पुतळ्या समोरील मुळासकट कापण्यात आलेल्या कडुनिंबाच्या झाडाला वर्धेतील अनेक सामाजिक संघटने तर्फे निसर्ग प्रेमी व वृक्षप्रेमी तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावरून वर्धेतील सामाजिक संघटना पर्यावरणाच्या विषयवार किती जागरूक व कर्तव्यदक्ष आहेत याचा परिचय त्यांच्या कृतीतून नक्की वर्धेकरांना अनुभवास येतोय मात्र त्या ठिकाणी निसर्ग प्रेमी तथा वृक्ष प्रेमींनी लावलेले कडुनिंबाचे झाडं परस्पर आपल्या सोयीनुसार पूर्णता मुळासकट कापून टाकणे ही बाब भावी पिढीचा सर्वनाश करणारी ठरत आहे यावर विशेष लक्ष देणे अति आवश्यक आहे.

वर्धा नगरपालिकेत मागील अडीच वर्षांपासून प्रशासक कार्यरत आहेत मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने नगरसेवक पदावर कार्यरत नाही याचाच फायदा घेऊन नगरपालिका प्रशासन सर्व नियम धाब्यावर ठेवून वागत असल्याचे दिसून येते आहे परंतु लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष का?वरील सर्व विकासाच्या नावावर होत असलेल्या बोगस कामावर व पर्यावरणाच्या दृष्टीने होत असलेल्या संपूर्ण गैरप्रकारावर वरील संपूर्ण सार्वजनिक बाबींचा सखोल विचार करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून यापुढे कोणीही असा अनाठायी गैरप्रकार करणार नाही व नुसताच कमिशन चा विचार करून विकास साधण्याचा प्रयत्न ही करणार नाही यादृष्टीने त्वरित योग्य पाऊल उचलावी अशी मागणी करण्यात आली आहे.

सौ रंजना सुरेश पट्टेवार नगरसेविका तथा सभापती भाजपा, राष्ट्रसेविका समिती सदस्या,स्थायी समिती सदस्या, रुग्ण कल्याण समिती सदस्या, सुदामपुरी प्रभाग क्रमांक 4 नगर परिषद वर्धा, श्री सुरेश पट्टेवार ज्येष्ठ समाजसेवक, स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केशव प्रभात शाखा वर्धा, अध्यक्ष शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना जिल्हा वर्धा, सदस्य सक्षम संघटना जिल्हा वर्धा,सल्लागार संगीत कलोपासक संघ जिल्हा वर्धा, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका वर्धा,भाजपा कार्यकारिणी सदस्य वर्धा

Tags: वर्धा शहरवर्धा: इंदिरा गांधी पुतळ्याच्या सौंदर्यीकरन व विद्युत रोषणाईच्या नावावर विकास कामांच्या नावावर भ्रष्टाचार.विकास कामांच्या नावावर भष्ट्राचार
Previous Post

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर सरकारी रुग्णालयात फळ वाटप.

Next Post

विद्युत स्मार्ट मीटर रद्द करा विदर्भ विकास आघाडी व आम आदमी पक्षाचे अनिल जवादे यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विद्युत स्मार्ट मीटर रद्द करा विदर्भ विकास आघाडी व आम आदमी पक्षाचे अनिल जवादे यांची मागणी.

विद्युत स्मार्ट मीटर रद्द करा विदर्भ विकास आघाडी व आम आदमी पक्षाचे अनिल जवादे यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In