राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- जिल्हा वार्षिक योजना 2023-2024 अंतर्गत जिल्हा परिषद शाळा, मक्ता ,ग्राम पंचायत भंगाराम तळोधी येथील नविन ईमारतीचं भूमिपूजन सोहळा दि. 16 जून रोजी गावकऱ्यांचा उपस्थितीत उत्साहाने पार पडला.
ग्राम पंचायत भंगाराम तळोधी अंतर्गत असलेला मक्ता गावातील गावकरी जिल्हा परिषद शाळेच्या ईमारत बांधकामाचा प्रतिक्षेत होते. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सूधीर मुनगंटीवार यांनी ईमारतीस मंजूरी देऊन गावकऱ्यांची प्रतिक्षेत पूर्णविराम दिली. यामूळे शाळा सूरू होण्याचा पार्श्वभूमीवर गावकर्यांमध्ये आनंदाच वातावरण निर्माण झालं व गावकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार व सूधीर मुनगंटीवार यांच आभार मानले.
सदर भूमिपूजन अमर बोडलावार यांचा हस्ते पार पडला. यावेळी ग्राम पंचायत भंगाराम तळोधी सरपंच सौ लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार, उपसरपंच सूनिल घाबर्डे, ग्रा पं सदस्य सौ. चांदेकर, अनिता पोटे, शा व्य समितीचे अध्यक्ष काशीनाथ पोटे, शा व्य समितीचे सदस्य रवी तारोडे, सर्व सदस्य तसेच शिक्षिका बोंडे मॅडम, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, पालकवर्ग व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित राहून सूधीर यांचे आभार मानले.

