Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीची आढावा बैठक, नागपूर शहरातील विविध विकास कामांचा घेतला आढावा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 19, 2024
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरीची आढावा बैठक, नागपूर शहरातील विविध विकास कामांचा घेतला आढावा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नाग नदी स्वच्छता प्रकल्पाच्या कामाला गती द्या; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश, ऑरेंज सिटी स्ट्रीटसह विविध विकास कामांचा घेतला आढावा.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नागनदी स्वच्छता प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश आज मंगळवार, दि. १८ जून रोजी दिले. २४३४ कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या असलेल्या सर्व प्रक्रिया देखील वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले.

नागपूर येथील रवी भवन मध्ये नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत नागपूर शहरातील विविध विकासकामांसाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आमदार मोहन मते, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपुर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी नितीन गडकरी यांनी नाग नदी स्वच्छता प्रकल्पाच्या कामांची माहिती घेऊन सर्व विभागांनी एकत्र येऊन तांत्रिक अडचणी सोडवाव्या असे निर्देश दिले. नागपूर शहर एनएमआरडीए परिसराचा एकत्रित प्रकल्प करून नदीत पुढे अस्वच्छ पाणी जाणार नाही, याचीही काळजी घेण्यात यावी, असे यावेळी म्हणाले. नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाचे आर्थिक आणि तांत्रिक मूल्यांकन पूर्ण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांना दिली. शहरातील जलकुंभ आणि पाणी पुरवठ्याचा आढावा देखील त्यांनी घेतला.

यावेळी ऑरेंज सिटी स्ट्रीट विकसित करण्याच्या प्रकल्पामध्ये निविदा काढण्यात दिरंगाई करू नये, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. दही बाजार, लोहाओळी, पोहा ओळी, अनाज बाजार, हरी गंगा, कॉटन मार्केट, संत्रा मार्केट, नेता मार्केट, डिक दवाखाना या विकास या विकास प्रकल्पांचे डिझाईन अंतिम टप्प्यात असून त्याच्याही निविदा लवकरच काढण्यात येतील, अशी माहिती नितीन गडकरी यांना देण्यात आली. रामजी पहेलवान रस्ता, एलआयसी चौक, जुना भंडारा रोड येथील भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू करावी तसेच रेल्वे स्टेशन मार्गावरील दुकानदारांची कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था करावी, असेही निर्देश श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी महामेट्रोच्या व्हॉट्सऍप तिकीट प्रणालीचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

Tags: ऑरेंज सिटी स्ट्रीटकेंद्रीय मंत्री नितीन गडकरीची आढावा बैठकनाग नदीनितीन गडकरी
Previous Post

चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावाचा वेगळा प्रताप, विविध राजकीय चर्चाना उधाण.

Next Post

गुरुदयालसिंह जुनी मित्रपरिवाराच्या वतीने वडनेर येथे सुधीर कोठारी यांच्या वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गुरुदयालसिंह जुनी मित्रपरिवाराच्या वतीने वडनेर येथे सुधीर कोठारी यांच्या वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा.

गुरुदयालसिंह जुनी मित्रपरिवाराच्या वतीने वडनेर येथे सुधीर कोठारी यांच्या वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In