अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील गुन्हे प्रगटीकरण शाखेने खात्रीशीर माहितीवरून पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात सुगंधित तंबाखू संग्रहण विरोधात जोरदार कारवाई करत लाखोंचा सुगंधित तंबाखू जप्त केला.
आरोपी नांदगाव बोरगाव येथील अनिकेत गोविंदराव चौधरी ने नांदगाव बोरगाव येथील त्याचे मामा हनुमंत रहाटे यांच्या घरी अनेक प्रकारच्या कंपनीचा सुगंधित तंबाखू माल ठेवला असल्याची माहिती दिली. त्यामुळे नांदगाव बोरगाव येथील रहाटे यांच्या घराची पोलिसांनी झाडाझडती केली असता अनेक प्रकारचा सुगंधी तंबाखू सह मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले. यामध्ये 5 लाख 79 हजार 67 रुपये असा मुद्देमाल जप्त केल्या गेला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भारत वर्मा, पोलीस कर्मचारी प्रशांत ठोंबरे, सुनील मेंढे, राहुल साठे, आशिष नेवारे, विजय काळे, अमोल तिजारे यांनी केली असून पुढील तपास पुलिस करीत आहे.

