✒️पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे:- येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. लाचखोर सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी याला 30 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपी लाचखोर सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी वर्ग 2 असून स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालय पुणे येथे कार्यरत महेश एकनाथ म्हात्रे हा असून त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली.
42 वर्षीय तक्रारदार ग्रामसेवक असून ते पूर्वी कार्यरत असलेल्या खेड तालुक्यातील नानेकरबाडी ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण आरोपी लोकसेवक म्हात्रे यानी केले असून तक्रारदारांचे नेमणुकीचे कालावधीतील कामकाजामध्ये अनियमितता आढळून आली असेल तर ती न दाखवन्या करीता तसेच तक्रारदारास वसुली नोटीस न काढन्या करिता आरोपी लोकसेवक महेश म्हात्रे यानी तक्रारदार यांना 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
पण तक्रारकात्याला लाच द्यायची नव्हती त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मध्ये तक्रार केली होती. त्यामुळे एसीबी ने भष्ट्र सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी म्हात्रे याला 30 हजारांची लाच घेताना सापळा रचून रंगेहाथ जेरबंद केलं. त्याला ताब्यात घेण्यात आले असून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला.
ही कारवाई सापळा पथक : पोलीस निरीक्षक-भारत साळुंखे.
पो शिपाई भूषण ठाकूर,
चालक पो शिपाई पांडुरंग माळी, लाप्रवि पुणे यांनी केली तर मार्गदर्शन अधिकारी राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे परिक्षेत्र.
श्री सुरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.