अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांचे आवाहन.
✒️सांगली जिल्हा प्रतिनिधी
सांगली,दि.१७ सप्टेंबर:- श्रमिक कष्टकरी जो कामगार मोठमोठे इमारती, घरे,कार्यालय रस्ते आयुष्यभर बांधून चांगल्या शहराची उभारणी करत असतो, मात्र हा कष्टकरी बांधकाम कामगार आपल्या हक्काच्या घर निवारा पासून वंचित राहत आहेत आशा कष्टकरी श्रमिक बांधकाम कामगारांना हक्काचा निवारा स्वतः चे घर मिळावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत दि.१३ सप्टेंबर २०२२ पासून सांगली जिल्ह्यात सर्व तालुक्यात एकाच वेळी घर देण्यासाठी सर्व्ह करण्याची सुरवात झालेली आहे. सर्व्ह करते वेळी नोंदणीकृत स्त्री अथवा पुरूष बांधकाम कामगारांची माहिती मध्ये मंडळाने दिलेला नोंदणी क्रमांक, कामगारांचा आधार कार्ड क्रमांक,रहात असलेल्या घरीची मुळ परिस्थिती तसेच ज्या कामगारांच्या नावे घर अथवा जागा नसेल किंवा भाड्याने राहत असेल याची माहिती महाराष्ट्र शासन यांचे सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, सांगली यांनी तयार केलेल्या फॉर्म वर कामगारांच्या कडे येणाऱ्या सुविधाकार तथा नोंदणी अधिकारी यांच्याकडे लिहून देण्याचे आहे. सांगली जिल्हा येत असणाऱ्या शहरात तसेच तालुक्याच्या सर्व गावात सुविधाकार तथा नोंदणी अधिकारी येतील त्यांना स्वतः बांधकाम कामगारांनी भेटू माहीत द्यावी तसेच मोठ्या प्रमाणात घराची नोंदणी करून महाराष्ट्र शासन – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांनी कामगारांच्या साठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ, जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केलेले आहे. यावेळी मोठ्या संख्येने बांधकाम कामगार वर्ग उपस्थित होते.
यावेळी जनरल सेक्रेटरी संजय संपत कांबळे, जिल्हा संघटक सिध्दार्थ कोलप, जिल्हा उपाध्यक्ष महोन साबळे, मनपा उपाध्यक्ष नितीन सरवदे, मिरज तालुकाध्यक्ष इ. मुसकानखान मुल्ला, मिरज शहरअध्यक्ष असलम मुल्ला, आटपाडी तालुकाध्यक्ष आबासो काटे, जिल्हा सदस्य हिरामण भगत, अनिल मोरे सर, युवराज कांबळे, विक्रांत सादरे, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, सिध्दार्थ कांबळे, चंद्रकांत कांबळे, अतिश कांबळे, संतोष माने, जावेद आलासे, विक्रांत गायकवाड,सहदेव कांबळे, महाविर ऐवळे आदी उपस्थित होते.
