अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ३० जुन:- विदर्भ शाहीर कलाकार परिषद केंद्रीय कार्यालय कन्हान द्वारा संचालित सावनेर तालुक्यातील कार्यकारणीची सभा नुकतीच वाकोडी येथे पार पडली. यावेळी सावनेर तालुक्यातील वाकोडी येथे मोठ्या प्रमाणात कलाकार मंडळी उपस्थित होते.
यावेळी या सभेत माजी जिल्हापरिषद सदस्य देविदास मदनकर, सरपंच रुपाली कोहळे, केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवंगडे केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेम्भूर्ने, विदर्भ प्रमुख यादवराव कन्होळकर, विदर्भ संघटक अरुण सहारे, जिल्हाध्यक्ष दयाल कांबळे, जिल्हा सरचिटणीस अरुण वाहने, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख युवराज मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव ठाकरे, विदर्भ महिला प्रतिनिधी संगीता भक्ते, जिल्हा महिला प्रतिनिधी मायाताई गणोरकर, प्रभा गायकवाड, माधुरी कन्होळकर, अनुष्का भुते, केवल कावळे, सावनेर तालुका प्रसिद्धी प्रमुख अनिल अडकिने, राजू खांडे तसेच यमुना लांजेवार इत्यादीनी सभेला संबोधित केले.
यावेळी संस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र शासन व केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनाची सविस्तर माहिती सांगण्यात आली. लोककला जिवंत राहावी यासाठी सर्वांनी प्रयतशील रहावे तसेच नवीन पिढीला प्रेरणा द्यावी अशी माहिती यादवराव कानोलकर यांनी सांगितली. तालुका अध्यक्ष अमोल रंगारी यांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली तर उपाध्यक्ष रंगराव शेंडे, विजय केवट, संभाजी लक्सने, सुखदेव धनवते, ज्ञानेश्वर चौधरी, ईश्वर तेलंगे यांनी मोलाचे सहकार्य केले. आणि पुढील वाटचालीकरिता भिवगडे आणि टेंभुर्णे यांनी नूतन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. तसेच यादवराव कन्होळकर यांनी सर्वांचे आभार मानले.

