हिंगणघाट शहरातील जनतेची मागणी लक्षात घेऊन हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय लगत मेडिकल कॉलेजची जागा निश्चित करा.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट ३० जुन:- हिंगणघाट शासकीय मेडीकल कॉलेजसाठी उपजिल्हा रूग्णालयाला लागुन असलेल्या ४१ एकर जागा निश्चित करण्यात यावी या मागणीचे निवेदन माजी आमदार प्रा.राजू तिमांडे सह माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर व शिस्त मंडळ यांनी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली व ७/१२ सकट संपूर्ण जागेची माहिती दिली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेतली व मेडिकल कॉलेज ४०० बेड दवाखाना लगतच करू असे आश्वस्त केले.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन मुंबई सुरू आहे. त्यात 27 जुन पासुन माजी आमदार प्रा. राजु तिमांडे यांच्या नेतृत्वात आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू आहे. शासकीय मेडिकल कॉलेजसाठी वर्धा जिल्हाधिकारी यांनी वेळा येथील प्रायव्हेट जागेचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला. राजकीय दबाव तंत्र वापरून ह्यांनी हिंगणघाट शहरातील लोकांवर केलेला अन्याय आहे. स्वतःचा आर्थिक फायदासाठी हे मेडिकल कॉलेज वेळा येथे पळवले असा समज सध्या नागरिकांमध्ये आहे.
हिंगणघाट येथील सरकारी दवाखान्याच्या आजू बाजूला धनाढ्य व्यापारी आणि राजकीय लोकांना भविष्यात व्यापार करायला जागा उपलब्ध नाही म्हणून ते कॉलेज वेळाला पळवत आहे अशी चर्चा शहरात जोरात सुरू आहे. हिंगणघाटला ४०० बेड हॉस्पिटलला मंजुरी व बांधकामासाठी १५१ कोटींच्या निधीचा जनप्रतिनिधी कडुन मोठा गाजावाजा करण्यात आला होता. १०० बेड सारखीच ४०० बेडची भविष्यात अवस्था राहणार असल्याने जनसामान्यांच्या १५१ कोटींचा चुराडा कशासाठी? असा प्रश्न हिंगणघाट शहरातील नागरिकांना पडत आहे.
त्याप्रमाणे संघर्ष समितीने संदर्भित तारखेला हिंगणघाट शहरात उपजिल्हा रूग्णालयाला लागुन असलेल्या ४१ एकर शासकीय जागेची माहिती व सर्वे नंबर १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८६, १९० एकुण जमीन १६.५२ हेक्टर ४०.८ एकर मौजा पिंपळगाव सोबत सातबाराच्या प्रति दिनांक ०९ जुन २०२४ ला संघर्ष समतीच्या पदादिकारी यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांची भेंट घेऊन मागणी लक्षात आणुन दिली.
यावेळी संघर्ष समितीने दाखविलेली जागा नागरिक व प्रशासनाच्या सोयीची असुन रहदारीच्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्गावर असल्याने सर्वाच्या दृष्टिने हितकारक आहे. असे असतांना हया जागेबाबत काय अडचणी आहेत हे अजुनही आम्हाला कळले नाही. मेडीकल कौन्सीलचा सदस्यांना ही जागा दाखविण्यातच आली नाही अशी चर्चा आहे.
उपजिल्हा रूग्णालय हिंगणघाट येथे ४०० खाटांचे रूग्णालय मंजुर झाले असुन तरतुत केलेली आहे. ती जागा उपजिल्हा रूग्णालयाच्या मागील शासकीय जागेवर आहे.शासनाने १५१ कोटीची तरतूद केलेली आहे. तरी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेल्या ४१ एकर जागेवरच शासकीय मेडिकल कॉलेजची जागा निश्चित करण्यात यावी असे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन देण्यात आले आहे.

