उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातील बाळापुर तालुक्यातील शेळद ग्रामपंचायत हद्दी मधील अंगणवाडी येथे अंगणवाडीतल्या मुलांची गैरसोय होत आहे. प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अंगणवाडी मध्ये एकाच ठिकाणी अंगणवाडीतल्या मुलांना वाटप होणारा माल अंगणवाडीतच ठेवला आहे. अंगणवाडीतल्या चिमुकल्यांना बसण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे या अंगणवाडीमध्ये साधं लाईट, फॅन, पिण्याचे पाण्याची, व्यवस्था येण्या जाण्यासाठी रस्ता, अंगणवाडी समोरच रस्त्यावर खूप मोठा चिखल जमा झालेला आहे हा चिखल तुडवतच या चिमुकल्या मुलांना अंगणवाडी यावे जावे लागते तसेच अंगणवाडी समोर झाडे झुडपे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. लहान मुलांना इंचू साप अशा विषारी प्राण्यापासून धोका निर्माण झाला आहे.
या अंगणवाडीमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आणि अश्या ठिकाणी मुलांना शिक्षण देत आहे. या अंगणवाडी मध्ये पंख्याची व्यवस्था सुद्धा नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही ताबडतोब या संपूर्ण गोष्टीची व्यवस्था करून दिली नाही तर अशोका फाउंडेशन व समस्त शेळद गावकरी मंडळी तिव्र आंदोलनाल छेडतील असा इशारा अशोका फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांनी दिला आहे.

