संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दिनांक १५ जुलै २०२४ रोज सोमवारला सकाळी ११.३० वाजता, राजुरा तालुका पत्रकार संघ, राजुरा येथे राजुरा शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत सिकलसेल तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, उद्घाटक माजी आमदार ऍड. वामणराव चटप, प्रमुख अतिथी माजी ऍड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, भाजपा चंद्रपूर लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे, भाजपा राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे, कृ. उ. बा. स. संचालक ऍड. अरुण धोटे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सतीश धोटे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदिप जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमास राजुरा आणि परिसरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.बी.यु. बोर्डेवार, कार्याध्यक्ष डॉ. उमाकांत धोटे, उपाध्यक्ष प्रविण देशकर, सचिव बादल बेले, सहसचिव बाबा बेग, कोषाध्यक्ष गणेश बेले, जेष्ठ संचालक आनंद भेंडे, मसुद अहमद, संचालक राजेंद्र मोरे, आनंद चलाख, नितीन मुसळे तथा समस्त राजुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

