उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना कामगार हितात गेली अनेक वर्षांपासून सक्रिय काम करत असुन कामगारांमध्ये त्यांचे हितासाठी सक्षम पर्याय म्हणून ओळख निर्माण केली आहे. विशेषत आरोग्य क्षेत्रामध्ये काही काळापूर्वी संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमरफारुक ककमरी यांनी सांगली जिल्हाची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त केली होती ती आता नव्याने घोषित करून नवीन कार्यकारिणीवर निष्ठेने आणि प्रामाणिक पणे संघटना वाढविण्यात आणि कामगार हितात काम करत कामगार चळवळीस चालवतील आशी आशा व्यक्त केली.
सांगली जिल्हाध्यक्षपदी विज्ञान लोंढे, सांगली जिल्हा महासचिव पदी देवीदास हावळे, शहर जिल्हाध्यक्ष पदी प्रशांत कदम, मिरज तालुका अध्यक्ष पदी आमीर मुजावर, मिरज तालुका उपाध्यक्ष पदी मंगेश गोपाळ वाघमारे, मिरज शहर अध्यक्ष पदी स्वप्निल जाधव, मिरज शहर उपाध्यक्ष पदी इकबाल नरवाडे, आशरफ सय्यद,सुभाष केसरे यांची निवडीचे पत्र आणि संघटनेचा ओळख चिन्ह देऊन निवड करण्यात आली. त्यावेळेस संघटनेचे संस्थापक सचिव फिरोज मोमीन, संस्थापक सदस्य रामचंद्र कोळी आदी उपस्थित होते.

