उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटनेने बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खळबळ माजली आहे. येथे पतीच्या मित्राने विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचार व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात राहणाऱ्या अक्षय बनसोडे वय वय 23 या आरोपी हा पिढीत महिलेच्या पतीचा मित्र असून तो विवाहित महिलेचे पती घरी नसताना गेला होता. पीडित विवाहित महिलेच्या पती घरी नसताना दिनांक 2 जून ते 29 जून या कालावधीत घरी गेल्यानंतर त्याने संबंधित महिलेचे फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर त्या महिलेचे काढलेले फोटो व व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली. आणि त्यानंतर शरीरसुखाची मागणी करून महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आरोपी अक्षय बनसोडे याने पीडित महिलेला पैशांची मागणीही केली. जर महिलेने पैसे दिले नाही तर तिची बदनामी केली जाईल, अशी धमकी फिर्यादी महिलेस दिली. ही बाब पीडित महिलेने पतीला सांगितली.
त्यानंतर पती व पत्नी बाळापूर पोलीस स्टेशन गाठत याबद्दल बाळापूर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. पतीच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी अक्षय बनसोडे या तरूणा विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

