Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

यवतमाळ जिल्हात प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची निर्घृण हत्या, दोन चिमुकले झाले अनाथ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 26, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, यवतमाळ, विदर्भ
0 0
0
यवतमाळ जिल्हात प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची निर्घृण हत्या, दोन चिमुकले झाले अनाथ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितेश पत्रकार यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्हातील घाटंजी तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे अनैतिक संबंधातील अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने पत्नीने निर्घुणपणे खून केला. ही घटना राजुरवाडी येथे आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी खून करणाऱ्या प्रियकर आणि पत्नीला बेड्या ठोकल्या आहे. प्रभाकर कवडुजी मारवाडी वय 40 वर्ष रा. राजूरवाडी ता. घाटंजी असे मृत पतीचे नाव आहे. तर जयश्री प्रभाकर मारवाडी वय 28 वर्ष आणि सुरज रोहणकर वय 28 वर्ष रा. समता नगर, वर्धा असे पोलिसांनी अटक केलेल्या पत्नीसह प्रियकराचे नाव आहे.

प्राप्त माहितीनूसार, घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे मृतक प्रभाकर हा आपल्या पत्नी व आपल्या दोन मुलांसह राहत होते. अश्यातच पत्नीने माहेर असलेल्या वर्धा येथील सुरज या तरुणा बरोबर विवाह बाहेर अनैतिक संबंधाचे सुत जुळले. त्यामूळे प्रियकर सुरज हा पत्नीच्या माहेरचा असल्याने त्याची जाणे येणे वाढले. मृतक प्रभाकर यांचे मुले पण त्याला मामा म्हणायचे. मात्र, पतीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. अनैतिक संबंधात पती अडसर ठरू लागल्याने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पत्नीने प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्या पतीची राहत्या घरी तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर ती भीतीने थरथरत होती. आता काय करायचं काही सुचण्याचा आत तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने प्रियकराने मदतीने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले.

प्रभाकर मारवाडी याची हत्या केल्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून मृतदेह गावाबाहेर रस्त्याच्या कडेला फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा अपघाती मृत्यू दाखविण्यासाठी कट रचला. पहाटेच्या सुमारास दोन तास अपघाती मृत्यू असल्याची चर्चा संपूर्ण गावात पसरली होती. त्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले.

घटनेनंतर पोलिसांनी मृतक प्रभाकर मारवाडी यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांना चौकशीसाठी पोलिस स्टेशनला बोलावल यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता. यावेळी मृतकाच्या मुलाने घटनेदरम्यान घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मृतक प्रभाकर यांच्या पत्नीने हत्येचा गुन्हा कबूल केला. गुन्ह्यातील आरोपी प्रियकर सुरज रोहणकर हा घटनेनंतर फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेत काही तासातच त्याला बेड्या ठोकल्या आहे. त्यानंतर तपासकामी घाटंजी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक शशीकांत नागरगोजे, निलेश कुंभेकर, संदिप गोहणे करीत आहेत.

कशी घडली ही घटना: आरोपी पत्नी जयश्री हीने आपल्या प्रियकर असलेल्या सुरज याच्या सोबत मिळून पती प्रभाकर याची घरातच हत्या केली. यावेळी प्रभाकर याचे दोन्ही मुले घरातच झोपून होते. त्या चिमुकल्या मुलांनी सदर घटनाक्रम बघितला. परंतु, आपल्याला मारण्याच्या भितीने अंगावर ब्लॅंकेट पांघरून झोपले असल्याचे भासविले होते.

दोन्ही मुले झाली अनाथ: आईच्या अनैतिक संबंधातून वडीलाच्या हत्या झाल्याने मृतकांच्या दोन चिमुकल्या मुलांना अनाथ झाली आहे. परंतू भितीपोटी तथा चाणक्य बुध्दीचा वापर करीत आपल्या वडीलांच्या खुनाच्या खुलासा चक्क पोलिसांच्या पुढे केला. यामुळे या चिमुकल्या मुलांच्या या कर्तबगारीची चर्चा होत असताना मात्र वडीलाचे छत्र हरविल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: घाटंजी पत्नीने केली पतीची हत्या.घाटंजी पोलीसदोन चिमुकले झाले अनाथ.यवतमाळयवतमाळ जिल्हात प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची निर्घृण हत्या
Previous Post

अकोला: मित्र घरी नसताना मित्राने केला भलताच कांड, मग व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्राच्या पत्नीवर अत्याचार!

Next Post

अहेरी गांवठाण क्षेत्रातील 390 बंद सातबारा ऐवजी तातडीने प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून द्या नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांचे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी गांवठाण क्षेत्रातील 390 बंद सातबारा ऐवजी तातडीने प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून द्या नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांचे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.

अहेरी गांवठाण क्षेत्रातील 390 बंद सातबारा ऐवजी तातडीने प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून द्या नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांचे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In