संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल येथे शिक्षण सप्ताह या उपक्रमा अंतर्गत इको क्लब च्या वतीने प्लांट फॉर मदर अभियाना अंतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणी माता यामधील नाते मजबूत होण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग होता. प्रत्येक विद्यार्थी व माता गटांमार्फत एकत्रित किमान ३५ रोपे लावण्यात आली. तसेच इको क्लबच्या अध्यक्षा कु.ज्योत्स्ना राजू टेकाम यांच्याद्वारे विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका मिसेस सिमरनकौर भंगू , मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, इको क्लबचे सदस्य तसेच विद्यार्थी व माता पालक उपस्थित होते. इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण पर्यावरण पूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात. हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहांच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वर्तनशीलता प्रोत्साहित करते. इको क्लब हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील पर्यावरण विषयी संकल्पना आणि कृती जाणून घेण्यात सक्षम करतात.
या कार्यक्रमांमध्ये इको क्लब चे विद्यार्थी, सदस्य तसेच माता-पालक वर्ग यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

