जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दखल घेत उपविभागीय अधिकारी, अहेरी यांना तातडीने कारवाई करण्याचा दिल्या सूचना.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- गांवठाण क्षेत्रातील जवळपास ३९० सातबारा गेल्या २० वर्षापासून महसूल विभागाने बंद केले आहे, परंतु त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) सदर जमीन मालकांना न दिल्याने सद्या त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, ह्या बाबत नागरिकांचा अनेक तक्रारी आल्यावर नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी जिल्हाधिकारी संजय दैने यांची नुकतीच गडचिरोली येथे भेट घेवून त्यांना ह्याबाबत निवेदन सादर केले, या निवेदनातून तातडीने ह्या ३९० बंद सातबारा ऐवजी जमीन मालकांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांच्याकडे केली.
सातबारा बंद असल्याने जमीन मालकांना जमिनीचे खरेदी विक्री करणे, वारसान चढविणे, गृहकर्ज घेणे, पीककर्ज घेणे किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेणे, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेणे ह्या सर्व कामांसाठी जमीन मालकांना सद्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी ह्या सर्व अडचणी जिल्हाधिकारी याना लक्षात आणून दिल्यावर त्यांनीही ह्याची तातडीने दखल घेत उपविभागीय अधिकारी, अहेरी ह्यांना पत्र देऊन ह्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे, त्यामुळे गेल्या २० वर्षांपासून प्रलंबीत असलेली ही समस्या सुटण्याची चिन्ह दिसत असल्याने जमीन मालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

