मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व वयोश्री योजनेस लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हिंगणघाट शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपा जिल्हा सचिव प्रा. किरण वैद्य यांचे जनसंपर्क कार्यालयात आयोजित शिबिरात सुमारे १४२ लाभार्थींनी नोंदणी केली. या शिबिरात लाभार्थींचे ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यात आले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थींना प्रतिमाह 1500 रुपये व वयोश्री योजनेअंतर्गत डीबीटी मार्फत 3000 रुपये एक रक्कमी प्राप्त होणार आहे. याव्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांची माहिती सुद्धा यावेळी लाभार्थींना देण्यात आली.
या शिबिराच्या आयोजनाकरीता प्रा. किरण वैद्य, दिनेश वर्मा, रमेश टपाले, ऍड. स्वप्निल धारकर, प्रदीप जोशी, अर्चना जोशी, सुभाष निनावे, विजय मुथा, रोशन डागा, अंकित ढगे, मामा ठाकूर, मुन्ना त्रिवेदी, दामोदर काळे, अनुकूल कोचर, शुभांगी वैद्य, अंकित त्रिवेदी, शालिनी हेडाऊ आदींनी अथक परिश्रम घेतले.

