महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- येथून एक खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने हॉटेल मालकिणीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची संगमनेर तालुक्यात घडली. तालुक्यातील एका गावातील हॉटेलमध्ये गुरुवार ता. १५ ला सकाळी दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडित महिलेने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन, पोलिसांनी हरिश्चंद्र कचरु शेवडे रा. वाळुंज, ता. दिंडोरी, जि. नाशिक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील हॉटेल पीडित महिला चालवीत होती. आरोपी त्या हॉटेलात कूक म्हणून कामाला होता. गुरुवारी सकाळी त्याने मालकिणीवर अत्याचार केला. तसेच शिवीगाळी करुन व झाल्या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीतेने याबाबत शनिवार ता. १७ला दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीविरुध्द दमदाटी, शिवीगाळी व अत्याचारा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक विजय खंडीझोड करीत आहेत.

