वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची आमदार समीर कुणावर यांनी भेट घेत केली मागणी
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज मुंबई येथे आमदार समीर कुणावार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत व त्यांना पत्र देत वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटच्या जागे संदर्भात उद्भवलेल्या अडचणींवर तातडीने तोडगा काढण्यासाठी विनंती केली.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विनाविलंब आयुर्विज्ञान विभागांचे आयुक्त यांच्याशी संपर्क साधत हिंगणघाट येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी समितीची नेमणूक करण्याची सुचना दिली. त्यावर तात्काळ समिती नेमून जागेची पाहणी करण्याकरिता आयुर्विज्ञान समितीची टिम हिंगणघाटला येणार असल्याची माहिती आमदार समीर कुणावार यांनी दिली आहे.
त्यामुळे हिंगणघाट येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सुकार होणार आहे. अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

