वेळप्रसंगी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे सहकार्य घ्या.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शेतकऱ्यांनी कापुस, तुर, सोयाबीन पिकामध्ये वेळोवेळी सर्वेक्षण, निरीक्षण घेऊन रोग, किडीच्या प्रादुर्भावाशी जागरूक राहावे व व्यवस्थापनासाठी स्थानिक कृषी विभागाचा अधिकाऱ्याचा सल्ला घेऊन गरजेनुसार फवारणी करावी. सुरक्षित कीडनाशकवापर तंत्राचा अंगीकार करून गरज असेल तर फवारणी करावी. शिफारशी प्रमाणे कीटकनाशके वापरून किटकनाशकावर होणारा अतिरिक्त खर्च कमी करण्याचा सल्ला तालुका कृषी अधिकारी परमेश्वर घायतिडक यांनी दिला.
आज मौजा आजंती शिवारात पिक पाहणी व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी परमेश्वर घायतिडक, कृषी पर्यवेक्षक एम.डी. वाळके, पोक्रा योजनेचे कृषी पर्यवेक्षक व्हि. एस. गुजरकर, कृषी सहाय्यक कु.साक्षी देशमुख, अजय मोहोड उपस्थित होते.
मौजा आजंती शिवारातील सोयाबिन, कापुस, तुर तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत लागवड केलेल्या मोसंबी पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना तालुका कृषी अधिकारी घायतिडक म्हणाले की, सोयाबीन पिकावर आढळून येणारा पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मुख्यता बियाण्या द्वारे होतो व या रोगाचा दुय्यम प्रसार पांढरीमाशी या किडीमुळे होतो सोयाबीन वरील पिवळ्या मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला पानावर पिवळ्या रंगाचे छोटे छोटे चट्टे दिसतात व त्यानंतर पानावर चमकदार पिवळ्या हिरव्या रंगाचे मोठ्या आकाराचे चट्टे दिसतात व सोयाबीन पिकातील पिवळा मोझॅक या रोगाने प्रादुर्भाव ग्रस्त असलेले झाड हिरवी पिवळी पाने असलेले दिसते सोयाबीनवर पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव फुलोरा अवस्थेत झाल्यास सोयाबीन पिकात उत्पादनात लक्षणीय घट येऊ शकते. सोयाबीनच्या शेताचे बांध तसेच शेत तणमुक्त ठेवावे सोयाबीनचे एकटे दुकटे पिवळा मोझॅकग्रस्त झाड शेतात आढळून आल्यास असे झाड शेताबाहेर काढून नष्ट करावे तसेच पांढरी माशीचे नियंत्रण करून व्यवस्थापना करिता पिवळे चिकट सापळे पिकाच्या समकक्ष उंचीवर लावावेत असे सांगितले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना वातावरणातील बदलामुळे सोयाबिन वरील पिवळा, मोझाक, चक्रिभुंगा, उंट अळी तसेच कापूस पिकावरील रस शोषन करणाऱ्या किडी वरील उपाययोजने विषयीक कृषी पर्यवेक्षक एम.डी. वाळके यांनी माहिती दिली तसेच कृषि विभागाच्या कृषि यांत्रिकीकरण एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, म.ग्रा.रो.ह. योजनाचा लाभ घेण्याचे उपस्थितांना आव्हान पोक्रा योजनेचे कृषी पर्यवेक्षक व्हि. एस. गुजरकर, यांनी केले. आभार कृषी सहायक कु.साक्षी देशमुख यांनी मानले. यावेळी सतिश देवढे, गलांडे,पंकज भालकर, मंगेश उरकुडे, अनिल तरोडकर सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

