प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी पंचायत समिती समुद्रपुर येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता जिल्हा परिषद वर्धा श्री. जाधव यांनी भेट देऊन स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, १५ वा वित्त आयोगच्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी रोशनकुमार दुबे गटविकास अधिकारी, तुषार गावंडे (क.अ.), प्रसेनजीत मुरार वि.अ (पं), महेश डोईजोड गट समन्वयक, श्री. ढोबळे, श्री. कळसकर (BRC) तसेच सर्व ग्रामपंचायततीचे ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित त्यांना सर्व अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

