संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- गोंडवाना विद्यापीठाने 8 जुलै 2024 च्या परिपत्रकाद्वारे संलग्नित महाविद्यालयांना ऑनलाईन प्रणाली द्वारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रथम सेमिस्टर करिता प्रवेश देण्याची प्रक्रिया व मुदत 7 ऑगस्ट 2024 पर्यंत दिलेली होती, मात्र ग्रामीण व आदिवासी भागात अतिवृष्टी, पूरस्थिती व शेतीची कामे या विविध कारणामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाला अजून पावतो प्रवेश घेतलेला नाही. तसेच दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे इंटरनेटची गती हळू असल्याने महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेशासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेने प्रथम वर्ष प्रवेशासाठी त्वरित मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोरलावार व पदाधिकाऱ्यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे केलेली होती या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने तात्काळ कारवाई घेत प्रथम वर्ष प्रवेशाची मुदत वाढ 22 ऑगस्ट 2024 पर्यंत केलेली आहे संघटनेच्या वतीने कुलगुरू व प्रशासनाचे आभार मानण्यात येत आहे.

