भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत भगत यांच्यासह नरेंद्र मोदी विचार मंच चे विदर्भ अध्यक्ष सुनील वांदिले यांनी हाती घेतली राष्ट्रवादीची तुतारी. खासदार अमर काळे यांच्या जन्म दिनी त्यांच्याच हस्ते प्रवेश घेत अतुल वांदिले यांनी दिली खासदाराला विशेष भेट.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मोठी इनकमिंग सुरू असून अनेक भाजप सह अनेक आजी माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या दररोज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश होत आहे. पक्षाचे शरदचंद्र पवार यांच्या विषयी निष्ठा राखत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या सतत पक्षातील कार्याला त्यांनी केलेल्या कामाच्या पाठपुराव्याला बळ देत जनसामान्य नागरिक, विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ, युवक महिला भगिनी यांच्या मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश होत आहे. यावरून असे स्पष्ट होते की राष्ट्रवादी कडे विधानसभा क्षेत्रातील जनतेचा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
काल नुकत्याच झालेल्या प्रवेशात भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत भगत तसेच नरेंद्र मोदी विचार मंच चे विदर्भ अध्यक्ष सुनील वांदिले यांचा वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांचा हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश करण्यात आला. वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश पार पडला.
याप्रसंगी शहराध्यक्ष बालूभाऊ वानखेडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे उपसरपंच तथा शेकापुर सर्कल अध्यक्ष प्रवीण कलोडे, तंटामुक्ती अध्यक्ष रितेश तडस,पंकज मानकर, राहुल जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.

