अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील समुद्रपूर तालुक्यातील पोथरा येथून एक धक्कादायक घटना 15 स्वातंत्र्य दिनी समोर आली आहे. पोथरा येथील धरणावरती पिकनिकसाठी गेलेल्या मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यश साखरकर राह. राष्ट्रीय महामार्गावरील संत ज्ञानेश्वर वार्ड पटवारी कॉलनी हिंगणघाट असे मृतक तरुणाचे नाव आहे.
मृतक यश साखरकर याचे वडील जाम येथील पी व्हि टेस्टस्टाईल या कंपनीत काम करतात. यश हे दोघे भाऊ असून त्याने स्थानिक जी.बी.एम मोहता विद्यालय येथून नुकतीच बारावी परीक्षा पास केली होती. आता त्याची अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाला ऍडमिशन होणार होती. परंतु या दुर्दैवी घटनेत यश याचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्वातंत्र्य दिन असल्याने मृतक यश आणि त्याचे इतर मित्र पोथरा धारणावर पिकनिक करीता गेले होते. यावेळी त्यांना धरणात पोहण्याचा मोह अवरला नाही. परंतु यशला पाण्याच्या अंदाज आला नाही तो पोहत दूर गेला आणि त्यात त्याचा बळी गेला. अपघातातील इतर तीन मीत्र सुरक्षित आहे.

