उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत वात्सल्य वृद्धाश्रम येथे आजी-आजोबांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी वृद्धाश्रमाचे देणगीदार, मान्यवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वात्सल्य वृद्धाश्रम हे गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवत असल्याने या दिवशी आजी-आजोबांचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच असतो यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून श्याम लोंढे, अमित कुलकर्णी, लता दिनकर पाटील, ज्योती कटाळे, स्वामीनारायण मंदिराचे महंत स्वामी दिव्यनयन महाराज, निलेश गुरनानी, महानुभाव पंथाचे मराठे बाबा, नगरसेविका हर्षदा गायकर, डॉ. प्रियंका पाटील, पूजा गवळे, डॉ. देविदास सोमवंशी आणि इतर देखील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचा सत्कार करून त्यांनी आपली मनोगत देखील याप्रसंगी व्यक्त केली, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी विशेष बाब म्हणजे नाशिक मधील प्रसिद्ध गायक सूत्रसंचालक संतोष फसाटे आणि त्यांची सर्व टीम यांनी या ठिकाणी सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम संपन्न करत आजी-आजोबांना भरपूर आनंद दिला. याप्रसंगी आजी-आजोबांना काही देणगीदारांनी यथायोग्य नाष्टा गिफ्ट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात, कार्यक्रमासाठी कीर व रोचवानी परिवार ,विवेक परदेशी , चिमण साधवानी यांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष सतीश सोनार, योगेश पिंपळगावकर आणि संपूर्ण स्टाफ यांनी यावेळी मेहनत घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

