अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- कलकत्ता येथे महिला डॉक्टर वर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आणि त्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. या अमानुष कृत्याच्या निषेध करण्यासाठी व अशा अमानुष कृत्याची पुनरावृत्ती होऊ नये या घृणास्पद कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी या मागणी करता शनिवार दिनांक १७ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे गांधी चौक सावनेर येथे निषेध रॅली व कॅण्डल मार्च काढण्यात आला. आणि याच वेळेपासून सर्व डॉक्टरांनी २४ तासाचा लाक्षणिक संप सुद्धा पुकारलेला आहे. मात्र महत्त्वाच्या सेवा सुरू राहणार असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या निषेध रॅलीत आयएमए संघटना, निमा संघटना तसेच सामाजिक संघटना, सर्वपक्षीय कार्यकर्ते, विद्यार्थी, सामजिक कार्यकर्ता, नागरिकांनी या निषेध रॅलीत सहभाग घेतला. या निषेध रॅलीत सर्व डॉक्टरांनी काळी टी-शर्ट परिधान केलेली होती.
ही रॅली गांधी चौक ते बस स्टॅन्ड बस स्टॅन्ड ते धापेवाडा चौक, होळी चौक, अशी भ्रमन करित गांधी चौक येथे समापन करण्यात आले.

