हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- रोट्रक्ट क्लब बल्लारपूरच्या वतीने दिनांक 19 ऑगस्ट रोज सोमवारला रक्षाबंधन निर्मिती नागरिकांना सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्था पाहणाऱ्या आणि आग किंवा इतर आपत्कालीन दुर्घटनेत कोणत्याही प्रकारचे सेवा देणाऱ्या अग्निशामक दला बरोबर रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
यावेळी रोट्रक्ट क्लब बल्लारपूरच्या वतीने बल्लारपूर शहरातील अग्निशामक दल व पोलिस दल या दोन्ही दलातील प्रत्येक कर्मचारीला राखी बांधण्यात आली. अग्निशामक दल सामान्य जनतेचा रक्षणासाठी चोवीस तास काम करतात. पोलीस दल सामान्य महीलाच्या सन्मानासाठी गरज असेल तेव्हा उभे राहतात. या अनुषंगाने रोट्रक्ट क्लब ऑफ बल्लारपूर तर्फे या दोन्ही अग्निशामक दल व पोलिस दल यांचा सोबत रक्षाबंधनाचा बंधु भावाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे.
ह्यावेळी रोट्रक्ट क्लब ऑफ बल्लारपूर चे अध्यक्ष रो. गौरव पटेल, सचिव रो. रजत परमार, प्रोजेक्ट सचिव रो. अनुज अग्रवाल, रो. मारिया सोनटक्के, रोटे. हेमराज गेडाम सह अनेक नागरिक उपस्थित होते.

