राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी समुद्रपूर शहरात आदिवासी कला सांस्कृतिक महोत्सवाचे केले आयोजन.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपुर:- राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी समुद्रपूर शहरात आदिवासी कला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. आदिवासी समाजाच्या सुप्त कला गुणांची आवड होती ती इतरांपर्यंत पोहोचवीत आदिवासी समाजाचा सन्मान करणे हाच या कला महोत्सवाचा हेतूने अतूल वांदीले यांनी हा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी समुद्रपुर तालुक्यांतील नागरिकांनी पहिल्यांदाच अनुभवला सांस्कृतीक कला महोत्सव. आदिवासी समाजाच्या कला महोत्सव बघण्यासाठी हजारोच्या संख्येने परिसरातील नागरिक समुद्रपुरात झाले होते दाखल.
आदिवासी समाजातील कला गुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन आदिवासी कला सांस्कृतिक महोत्सव, प्रबोधन मेळावा व गोंडी नृत्याचा धमाका समुद्रपूर शहरातील दिपाली मंगल कार्यालय आयोजित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी समुद्रपूर तालुका आणि आदिवासी समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने ०९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजातील कला गुणांना वाव मिळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

