हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- सक्तीचे व मोफत शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा संवैधानिक अधिकार असताना अधिकारी कोणत्या दबावात काम करत आहेत? आम आदमी पक्षातर्फे बल्लारपूर शहरातील नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांचे 15 ऑगस्ट पूर्वी निरीक्षण दौरा करण्यात आला, या दौऱ्यात सर्व शाळांची अवस्था दयनीय परिस्थितीत आहे, असे आम आदमी पक्षाने जाहीर केले आहे.
15 ऑगस्ट 2024 ओलांडले असताना देखील आता पर्यंत सर्व विद्यार्थांना शिक्षण साहित्य पाठ्यपुस्तक, बुक, कपडे, दप्तर, जोडे व इतर आवश्यक असलेली सामग्री मिळालेले नाही. एकूण चौदा शाळांपैकी साईबाबा प्राथमिक, गाँधी माध्यमिक, सरदार पटेल प्राथमिक शाळा (विभाग डेपो) व आंबेडकर प्राथमिक शाळा (बस्ती), या चार शाळा सोडले तर बाकीचे सर्व शाळां मध्ये विद्यार्थांकरिता वर्ग खोल्यांची कमतरता भासत आहे. सर्व शाळांमध्ये सफाई कर्मचारी व शिक्षकांची संख्या कमी आहे. साईबाबा प्राथमिक शाळेत आपच्या प्रयत्नामुळे डागडुगीचे काम चालू झाले आहे. पण तेही कागदावर पहिलेच नोदविण्याचे प्रकार दिसत आहे. दोन शाळा सोडले तर कोणत्याही शाळेत विद्यार्थांना शिस्त शिकविण्याचे कोणतेही प्रयत्न करतांना शिक्षक दिसत नाही. तर नगरपरिषदेचे अधिकारी देखील लक्ष देत नाही. सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची खूप मोठी गरज आहे.
आम आदमी पक्षाच्या दबावाने क्रीडा साहित्य तर देण्यात आले पण क्रिडा प्रशिक्षण देण्याकरिता कुठ्ल्याही शाळेत क्रिडा शिक्षक नाही. तरी शिक्षण अधिकारी, प्रशासक, गट शिक्षण अधिकारी, प्रशासक शिक्षण अधिकारी व शिक्षक डोळे बंद करून आहेत, ज्या शिक्षणाच्या भरोश्यावर अधिकारी व शिक्षक तयार झालेत, त्याच शिक्षणाची हत्या करण्याच्या प्रयत्नात हे सर्व अधिकारी पण दोषी राहतील, असे पुप्पलवार यांनी मत मांडले आहेत.
बल्लारपूर शहरातील सर्व गोर-गरिबांच्या गरजू चिमुकल्यांच्या भवितव्यासाठी आम्ही असेच सतत प्रयत्नशील राहणार. अधिकारी शिक्षणाला दुर्लक्ष करत आहे पण असा हलगर्जीपणा आता तरी बल्लारपूर शहरात आम आदमी पार्टी खपवून घेणार नाही. लवकरच शाळांची पुन्हा एकदा LIVE निरीक्षण दौरा करणार व भविष्यात शिक्षण सुधारणा करण्याचा बाबतीत आमची भुमिका तीव्र करू असे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी आव्हान केले आहे.

