महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगोली:- वसमत तालुक्यातून एक संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. येथे चक्क कार्यालयात एका तलाठ्याच्या डोळ्यात मिर्ची टाकून त्याची हत्या करण्यात आली. तलाठी संतोष पवार असे हत्या करण्यात आलेला व्यक्तीचं नाव असून प्रताप कराळे असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने महाराष्ट्र राज्यात चाललय तरी काय? दिवसा ढवळ्या हत्या खून बलात्कार वाढत आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंगोली जिल्हातील वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार हे त्यांच्या तलाठी कार्यालयात काम करत असताना प्रताप कराळे नावाच्या तरुणाने कार्यालयात प्रवेश करत व्हाट्सअप्प ग्रुपवरील मेसेज वरुन तलाठी यांच्या सोबत वाद सुरु केला. त्यावर तलाठी पवार यांनी मी योग्यच टाकले जे टाकले असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर प्रताप कराळे याने तलाठी पवार यांच्या डोळ्यात मिर्चीची पूड टाकत चाकू काढला आणि तलाठी पवार यांच्यावर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली. त्यात पवार शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव व्हायला सुरुवात झाली यावेळी तिथे असलेले शिकाऊ तलाठी बालाजी डवरे यांनी कराळे यांना धरून चाकू हिसकावून घेत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कराळे याने पोबारा केला. यानंतर तलाठी संतोष पवार यांना गंभीर जखमी अवस्थेत परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. जमिनीचा वादातून ही हत्या झाला असण्याची शक्यता अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
तलाठी संतोष पवार यांची आरोपीने हत्या केल्याची माहिती मिळताच संपूर्ण पवार यांच्या कुटुंबाने टाहो फोडत आरोपीला फाशी देण्याची मागणी केलीय. पोलिसांनी आरोपी प्रताप काळे याला अटक केलीय. आरोपी संतोष कराळे हा वारंवार तलाठी संतोष पवार यांना तुम्ही माझी जमीन इतरांच्या नावावर करून देताल असे म्हणत त्रास देत होता. मात्र असं करता येत नसतं अस वारंवार सांगूनही आरोपीने ऐकले नाही. त्याने आज थेट पवार यांचा निर्दयीपणे हत्या केली.

