मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आज दिनांक 28/08/2024 ला संघर्ष समीतीचे पुरुष आणी महिला वर्धेला जावुन जिल्हाधिकारी यांना भेटुन नियोजित हिंगणघाट शासकीय मेडिकल कॉलेजची जागा कधी फायनल होत आहे हे विचारले असता, त्यावर जिल्हाधिकारी बोलले की मी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील जागा आणी जाम ची जागा असे दोन प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहे. दोन पैकी मेडिकल कॉलेज कुठे स्थापण करायचे हे शासन स्तरावर ठरवतील. हिगणघाट नागरीकांच्या मागणी नुसार संघर्ष समितीने हिंगणघाट च्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे खाली असलेल्या शासकीय जागेवरच मेडिकल कॉलेज व्हावे असे परत निवेदनात नमुद केले.
मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरातील दिड ते दोन लाख व्यक्तिच्या जिवाळ्याचा प्रश्न निर्माण झाला असुन सव्वा लाखाच्या वरती मतदारांच हे शहर आहे. हिंगणघाट शहरातील सर्व जनतेच सद्या लक्ष ह्या शासकीय मेडिकल कॉलेज कडे लागल असुन मागील चाळीस वर्षापासुन ज्या गोष्टीची हिंगणघाटकर आतुरतेने वाट पाहात होते, ती गोष्ट आता तोंडाजवळ आली आहे. एक प्रकारे, हिंगणघाट शहरासाठी हे मेडिकल कॉलेज म्हणजे तिन पिढ्यानंतर कुळाला मिळालेला वारस आहे.
यावेळी शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समितीने जिल्हाधिकारी यांना लक्षात आणून दिले की, जेंव्हा संघर्ष समितीच्या महिला अन्नत्याग उपोषणाला बसल्या त्यावेळी तुम्ही हिंगणघाटच्या रेस्ट हाऊसला मिटींग घेतली आणी उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील खाली जागेचाच प्रथम विचार करु. जे आरक्षण आहे ते काढता येईल. त्यानंतर आमदार समिर कुणावार आणी उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलन मंडपाला भेट देऊन त्यांनी पण सांगितले की उपजिल्हा रुग्णालयाच्या मागच्या जागेचा प्रथम 99.99 टक्के विचार करु आणी जे आरक्षण आहे ते काढता येईल. पण वेळेवरच जामची जागा कशी आली. शासनाच्या जि.आर मधे मौजा हिंगणघाट अस नमुद केल असल्याने हे मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरातच व्हायला पाहिजे. मेडिकल कॉलेज साठी लागणारी जागा उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे शिल्लक आहे. जर हे मेडिकल जामला स्थापण झाल तर हिंगणघाटच्या जनते सोबत ऐक प्रकारचा अन्याय होईल आणी हिंगणघाटकर कधीही माफ करणार नाही.
जर हे मेडिकल कॉलेज हिंगणघाट सोडुन दुसरी कडे गेल तर हिंगणघाटची जनता आपल्या हक्कासाठी नक्कीच रस्त्यावर उतरेल आणी मोठ्ठ जन आंदोलना होईल, हे पण निवेदनात नमुद केले. आज निवेदन देवुन जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करतांना समीतीचे अध्यक्ष सुनिल पिंपळकर, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, सचिव सुरेंद्र टेभुर्णे, जगदिश वांदिले, राजु भाईमारे, अमीत रंगारी, विद्या गिरी, सुजाता जामुनकर, सुनिता तेलतुमडे, सुजाता जिवनकर, दिपाली रंगारी, सिमा तिवारी, नालंदा राऊत इत्यादी हजर होते.

