अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा हिंगणघाट इथे तालुका स्तरीय खो – खो स्पर्धा चे दिनांक 29 ऑगस्ट 2024 ला पार पडली. या स्पर्धेत डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय हिंगणघाटच्या 14 वर्षा खालील मुलीच्या खो – खो संघाची जिल्हा स्तरावर निवड झाली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव अनिल जवादे, प्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत नगराळे, उपमुख्याध्यापिका सुनिता खैरकार, उपप्राचार्य विजय नानोटकर, पर्यवेक्षक दिनेश वाघ, रवींद्र शिरपूरकर, विलास भोमले तथा खो-खो प्रशिक्षक सतीश गिरडे, रोहीत राऊत तथा क्रीडा विभागाचे गोपाल मांडवकर, डॉ. पंकज ठाकरे, माटे मॅडम, धनंजय कापसे, चेतन पाटील, प्रतीक पाटील, मेश्राम मॅडम, भगत मॅडम, धोटे मॅडम, बांगरे मॅडम, प्रशांत पाटील, राहुल गिरडे, पपेश मुंजेवार, दिनेश बागेसर यांनी पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

