प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहर हे कापड गिरण्यामुळे प्रसिद्ध आहे. पण आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे आज शहरातील कापड मिल बंद झाले आहे त्यामुळे हजारो मिल कामगार बेरोजगार झाले आहे. निवडणूक आली की अनेक पक्षाचे नेते मिल सुरू करू, कामगारांना न्याय देऊ असे पोकळ आश्वासने देऊन निवडणूक जिकंतात आणि परत मिल कामगाराच्या प्रश्नाला केळाची टोपली दाखविली जाते. हे मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात आपल्या विविध मागण्यासाठी अनेक कामगारांनी आंदोलन केली. त्यात मिल कामगाराना 10 हजार पेन्शन व हिंगणघाट येथील बंद पडलेले डागा व मोहता मिल पुन्हा सुरू करा: डाॅ. उमेश वावरे याची मागणी केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून हिंगणघाट शहरात दोन कापड मिल (डागा व मोहता) बंद पडले असल्यामुळे या शहरातील कामगाराच्या व्यथा आपला पर्यन्त पोहचवत आहे. एखादा मिल कामगार जेव्हा त्याचा जिवनाचे 30 ते 35 वर्ष गिरणीत काम करून निवृत होतो त्यानंतर त्याच्या वृध्दापकाळात त्याला फक्त 1 हजार रूपये निवृत वेतन मिळते. तुटपुंज्या रक्कमे वर गिरणी कामगार व त्याची पत्नी सूध्दा महागाईच्या काळात जगु शकत नाही त्यामुळे गिरणी कामगाराचे उर्वरीत आयुष भकास होत आहे.
कापड गिरणी कामगाराना निवृती नंतर देण्यात येण्याऱ्या पेंन्शन मध्ये वाढ करून दरमहा किमान 10 हजार रूपये देण्यात यावे. तसेच हिंगणघाट व आजूबाजूचा परीसर हा कापूस पिकवणारा पट्टा असल्याने या परीसराची काॅटन सिटी म्हणून पूर्वापार ओळख आहे त्यामुळे कापसावर प्रक्रिया करून कापड बनविणारा दोन कापड गिरणा येथे अस्तित्वात होत्या पंरतु कांलातराने बंद पडला आहे. तरी या प्रकरणी लक्ष देऊन कापड गिरण्या पूर्ववत सुरू कराव्यात जेणे करून हिंगणघाट तालुक्यात पसरलेली प्रचंड बेरोजगारी युवक व युवतीना गिरण्याचा माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ शकेल. असे निवेदन उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत पतंप्रधान नरेन्द्र मोदी, गिरिराज सिंग केन्द्रीय टेक्सटाइल्स मंत्री भारत सरकार, एकनाथ शिदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, देवेन्द्र फडनविस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अजीत पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अमर काळे खासदार वर्धा, समिर कुणावार आमदार हिंगणघाट, राहूल कर्डिले जिल्हाधिकारी वर्धा याना देण्यात आले.
यावेळी मनीष कांबळे, जिवन उरकुडे, प्रदीप कोल्हे, चारू आटे, विलास टोबळे, गौतम सुटे, महादेव कोल्हे, रामाजी पराते, मधुकर कावळे, विनायक वाकडे, सिद्धार्थ नगराळे, मारोती कोपरे एकनाथ डेकाटे, संजय पूनवटकर किशोर नवघरे, सुधाम ढाले प्रणय पाटील, विनोद गुळघाणे तुषार पाटील, सुभाष कावळे रामचन्द्र मासुरकर, अशोक रघाटाटे किशोर रिठे, मनोज काळे, यशंवत शंभरकर, मिलीद सुटे प्रदिप मोरकर, अरूण बोबडे राजेश खानकूरे सह इत्यादि कार्यकर्ता उपस्थिति होते.

