प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्यातील शेतकरी, शेतमजूर कामगार महिला व बेरोजगारांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळाव्या, सन्मानजनक आयुष्य जगण्यास मिळावे म्हणून आज वर्धा येथे शेतकरी, शेतमजूर कामगार महिला व बेरोजगार युवकांच्या विविध मागण्यासाठी शिदोरी आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर हे शिदोरी आंदोलन करण्यात आले. या शिदोरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल वांदीले सह शेकडो नागरिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकरी, शेतमजूर कामगार महिला व बेरोजगार वर्ग खऱ्या अर्थाने या राज्याचा पाया आहे आणि जर हाच वर्ग दुर्लक्षित होत असेल, तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कायम कटीबद्ध राहू. तसेच सरकारला या सर्व प्रश्नांवर सळो की पळो करुन सोडू. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर कामगार महिला व बेरोजगार वर्गाला न्याय मिळवून देऊ, ही भूमिका यावेळी मांडली. यावेळी इंडिया अलायन्सचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व सामाजिक संघटनेचे प्रमुख सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

