हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर येथून एक मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे. शेतात विजेचा जोरदार शॉक लागल्याने 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गणेशपूर गावात शोककळा पसरली आहे. पुंडलिक मुखरू मानकर वय 62 वर्ष, प्रकाश खुशाल राऊत वय 42 वर्ष, युवराज डोंगरे वय 40 वर्ष नानाजी पुंडलिक राऊत वय 62 वर्ष असे मृतकांचे नावे आहेत. यात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. हे सर्व जण गणेशपूर गावातील रहिवासी होते.
सध्या सर्वत्र शेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे रानटी जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतात विजेचा करंड लावले जातात. ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर येथील नानाजी पुंडलिक राऊत यांचे शेतात धानाची लागवड करण्यात आली आहे. हे शेत जंगलाला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हैदोसाने पिकाचे मोठे नुकसान होत आहे. बुधवारी (दि.11) सकाळी नानाजी राऊत यांचे शेतात पाच शेतकरी धानाला खत देण्यासाठी गेले होते. गेल्यानंतर सर्वप्रथम सर्वांनी खत दिले. त्यानंतर जंगलातून येणाऱ्या वन्यप्रण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्याकरीता जंगलाच्या बाजूने शेताच्या तार लांबविण्याचे काम सुरू होते. पाचही जणामध्ये तार लावत असतानाच समन्वय न राहिल्याने विद्युत प्रवाह सुरू झाला त्यामुळे एकाचवेळी पाचही जणांना जोरदार विद्यूत शॉक लागला.

