पालघर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पालघर:- राज्यात मुली किती सुरक्षित आहे हे कुणी सांगू शकत नाही. बदलापूर येते चिमुकल्या मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असताना परत एका मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटनेने राज्यात खळबळ माजली आहे. पालघरमध्ये गणपती आगमन मिरवणूक बघायला गेलेल्या एका 10 वर्षीय मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.
पालघर येथे एका 10 वर्षीय चिमुकलीला 30 वर्षाच्या दोन नराधमांनी अडवले आणि निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हे खळबळजनक प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ या घटनेचा गुन्हा दाखल करून दोन्ही नराधम आरोपीविरुद्ध कारवाई करत त्यांना बेड्या ठोकल्या आहे. या चिमुकलीच्या अंगावरील फाटलेले कपडे बघून आई वडिलांनी या मुलीकडे चौकशी केली. यावेळी पिढीत मुलीने तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर रोजी 10 वर्षीय पीडित मुलगी गणपती आगमन मिरवणूक बघण्यासाठी गेली होती. यावेळी मिरवणूक बघून घरी परत जात असताना दोन्ही नराधमांनी तिला आडवले. नराधम हे पिढीत मुलीच्या घराच्या परिसरातच राहणारे असल्याने या दोघांनाही पीडित मुलगी ओळखत असल्यामुळे ती त्यांच्याशी बोलत होती. दोन्ही आरोपींनी तिला बोलण्यात गुंतवले आणि नंतर जबरदस्तीने निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेले. तिथे आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. आरोपींनी नंतर तिला सोडून दिले. दरम्यान, मुलगी परत न आल्याने तिचे आईवडील शोधत होते. रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ती घरी आली. तेव्हा तिच्या अंगावरील कपडे फाटलेले होते.
आईवडिलांनी तिला कपडे फाटण्याचे कारण विचारले, तेव्हा तिने झालेल्या प्रकाराबद्दल सांगितले. आईने तिला नीट बघितले तेव्हा तिच्या प्रायव्हेट पार्टवर रक्ताचे डाग होते. पीडित मुलीने अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आईवडिलांनी सांगितली.
आईवडिलांनी पीडितेसह पोलीस स्टेशन येथे धाव घेत झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेतला आणि या नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी या आरोपींना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.

