*कार्यक्रमाचे अध्यक्षा ग्रामपंचायत सरपंचा सरोजनाताई अनिल पेंदाम यांचे शुभ हस्ते पार*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मोबाईल नं. 9420751809
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तिमरम जिल्हा परिषद शाळेत
आज दि. 27/09/2024 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिमरम येते पालक सभा आयोजित करण्यात आले.सभेचे अध्यक्ष मा. सरोजना अनिल पेंदाम सरपंच ग्रा. पं तिमरम यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात करण्यात आली आहे. सभेत 11 सदस्य निवडण्यात आलेले असून . 11 सदस्यमधून अध्यक्ष व उपअध्यक्ष निवडण्यात आले. अध्यक्ष म्हणून मा. महेशभाऊ मडावी व उपअध्यक्षा म्हणून मा. रेश्मा ताई सिडाम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सभेत अध्यक्ष व उपअध्यक्ष यांना पालक वर्ग पुष्पगुच्छा देऊन स्वागत करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिमरम चे मुख्यध्यापीका मा. आत्राम मॅडम, गंगारेडडीवर सर, गुंडावार सर, यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित सदस्य व पालक आणि शिक्षक यांचा आभार अध्यक्ष यांनी मानले आहे. या वेळी पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

