बौध्द समाजाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे व सचिव मधुकर गोंगले यांची उपस्थित देण्यात आले धम्मदान.
बुद्ध मूर्तिचे प्रतिष्ठापणा भन्ते डॉ. अभय नायक तसेच भन्ते तिस्स बोधी, भन्ते अनिरुद्ध नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील छल्लेवाडा गावात संपूर्ण मानव जातीला शांती, अहिंसा, कल्याणकारी मार्ग सांगणाऱ्या तथागत भगवान गौतम व भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. हा कार्यक्रम यावेळी नागपूर येथील भन्ते डॉ. अभय नायक व भन्ते तिस्सा बोधी यांच्या उपस्थित संपन्न झाला.
भन्ते डॉ. अभय नायक व भन्ते तिस्सा बोधी यांनी उपस्थिती नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यांनी म्हटले की, तथागत गौतम बुद्धाच्या विचार हा सर्व मानव जातीचा कल्याणाचा मार्ग आहे. बुद्धाचा विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधनिक क्रांती सर्व पिढीत गरीब दलित आदिवासी मजूर कामगार शेतकरी यांना पुढे नेणाऱ्या आहे. त्यामुळे आज बुद्ध धम्म झपाट्याने वाढत आहे.
या वेळी धम्मदान करताना छल्लेवाडा येथील पंचशील बौध्द मंडळाचे अध्यक्ष मनोहर भसारकर, उपाध्यक्ष विलास बोरकर, सचिव लक्ष्मण जनगम, सहसचिव प्रभाकर जुमडे व भगवान दुर्गे, कोषाअध्यक्ष प्रभाकर दुर्गे व शंकर भासारकर, उपकोषाअध्यक्ष गुलाब देवगडे व तिरुपती दुर्गे, कार्यध्यक्ष राजाराम दुर्गे, मलय्या बोरकर, तिरुपती दुर्गे, वैकुंठम आकुदारी, अनमोल बोरकर, सुनील जनगम. सल्लगार सचिव, स्वामी जनगम, रवी दुर्गे, प्रवीण कुंबारे, अनिल दुर्गे, मंडळाचे सूत्रधार विठ्ठल भसारकर आदी उपस्थित होते.
यावेळी धम्मदान करतांना राजाराम येथील न्यू स्टार बौध्द मंडळाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे, सचिव तथा पत्रकार मधुकर गोंगले, पत्रकार बांधव जावेद अली, सुरेश दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश मोतकुरवार, संतोष बोम्मावार उपस्थित होते.

