Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेली गटबाजी उमेदवाराचा करणार गेम?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 20, 2024
in निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेली गटबाजी उमेदवाराचा करणार गेम?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महाविकास आघाडी मध्ये जागेचा प्रश्न सुटलेला नाही. त्यातच हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांतर्गत गटबाजीनं ग्रासलं आहे. आता पासूनच लॉबिंग सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गुप्त बैठका होत असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षेमुळे पक्षाला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील दोन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तिमांडे यांच्या पराभव करून विद्यमान भारतीय जनता पक्षाचे आमदार समीर कुणावर यांनी एकहाती सत्ता आणली. माजी आमदार राजू तीमांडे यांच्या पराभवाला जबाबदार एका स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला मतदार आणि नागरिकांनी ठरवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानेच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा घात केला अशा चर्चा हिंगणघाट समुद्रपुर सिंधी रेल्वे विधानसभा मतदार संघात चर्चा सुरू होत्या.

यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार राजू तिमांडे, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व हिंगणघाट नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष सुधीर कोठारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले विधानसभेची उमेदवारी मिळणार म्हणून प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुणाला आशीर्वाद देतात याकडे संपूर्ण हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहराच्या बाहेर गेल्याने हिंगणघाट शहरासह अनेक गावातील नागरिकांनी आमदार समीर कुणावर यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. त्याचा सरळ फायदा विरोधी उमेदवाराला होणार होता पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यानं मध्ये गटबाजी दिसून येते असल्यामुळे मतदाराच्या नाराजीचा लाभ विरोधी उमेदवार किती उठवू शकतो हे निवडणुकी दरम्यान दिसून येणार आहे.

गटबाजी राष्ट्रवादीचा उमेदवाराचा घेणार बळी?
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अतुल वांदिले, सुधीर कोठारी आणि राजू तिमांडे यांच्या हिंगणघाट विधानसभा मतदार संघात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हे तिघ नेते कधीही एका मंचावर न येता कोणाची ताकत किती आहे हे दाखविण्यासाठी वेगवेगळे पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करत अनेकांना पक्षात प्रवेश दिला. पण या विधानसभा निवडणुकीत हे तीनही नेते एकत्र आले नाही तर ही गटबाजी राष्ट्रवादीचा उमेदवाराचा घेणार बळी? असे दिसून येत आहे.

वांदिले यांना उमेदवारी तर…!
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी मागील अनेक महिन्यापासून पक्षात अनेकाचा प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये त्यांची प्रतिष्ठा वाढली आहे. त्यात ते युवा नेते असल्याने युवा आणि वुद्ध मतदारांमध्ये समयनव्य साधून ते विद्यमान आमदार समीर कुणावर यांना चांगली टक्कर देऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे.

हिंगणघाट मधील चाण्यक कोठारी…!
हिंगणघाट मधील चाण्यक म्हणून प्रसिद्ध असलेले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व हिंगणघाट नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष सुधीर कोठारी हे पण विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून कमर कसून आहे. पण त्यांना पक्षाने उमेदवारी नाही दिली तर? ते कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Tags: Atul WandileHinganghat vidhansabha electionRaju TimandeSudhir kothariअतुल वांदिलेमाजी आमदार राजू तिमांडेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारसुधीर कोठारीहिंगणघाट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेली गटबाजी उमेदवाराचा करणार गेम?
Previous Post

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

Next Post

जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा स्पर्धेत राजुरा येथील इन्फंटच्या विद्यार्थ्यांनी पटकावला प्रथम क्रमांक.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा स्पर्धेत राजुरा येथील इन्फंटच्या विद्यार्थ्यांनी पटकावला प्रथम क्रमांक.

जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा स्पर्धेत राजुरा येथील इन्फंटच्या विद्यार्थ्यांनी पटकावला प्रथम क्रमांक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In