श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सगळ्याच पक्षांनी आता उमेदवार याद्या जाहीर करायला सुरूवात केली आहे. त्यात काल भाजपने आपली पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदार संघातून नमिता मुंदडा Namita mundra यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदार संघात जोरदार टक्कर बघायला मिळणार आहे.
भाजपच्या पहिल्या यादीमध्ये बड्या नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यात केज विधानसभा मतदार संघातून नमिता मुंदडा याना उमेदवारी देण्यात आली. 2019 किंवा यापूर्वी झालेल्या कोणत्याही विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणूक ही भाजपसाठी काहीशी वेगळी असणार आहे. याचं कारण म्हणजे भाजप यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांसोबत मैदानात उतरणार आहे.

