नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- नाशिक रोड येथील तथागत बुद्ध विहारात उपासिका महिला संस्था यांचे विद्यमाने आयोजीत भारतीय बौध्द महासभा राष्ट्रीय भिक्खु संघाचे कोषाध्यक्ष पुज्य भन्ते बी सुमेध बोधी यांचा उपस्थितीत वर्षावास महामंगलमय पर्व समारोह उत्साहात संपन्न झाला.
आषाढ पौर्णीमा ते अश्वीन पौर्णीमा पर्यंत बौध्द धम्मात वर्षावास महामंगलमय पर्व साजरे करण्यात येत असते गुरुवार दिनांक 17 आक्टोंबर 2024 रोजी तथागत बुध्द विहारात महामंगलमय पर्व वर्षावास समारोह पुज्य भन्ते बी सुमेध बोधी यांनी मिळालेल्या दानातून दानपारमीता केली. वर्षावास महामंगलमय पर्वात रोज तथागत बुद्ध विहारात उपस्थित असणाऱ्या व भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्म ग्रंथाचे वाचन, मनन, चिंतन, श्रवन करणाऱ्या महिला उपासिका माताजींना दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) संस्थापक डॉ. बाबासाहेबआंबेडकर धम्म संस्थेचे “बौध्द जीवन संस्कार पाठ” ग्रंथ दान पारमिता पुज्य भन्ते बी सुमेध बोधी यांचे वतिने दान पारमिता करण्यात आली.
यावेळी उपस्थित शील संपन्न धम्म उपासक धम्म उपासिका यांना पूज्य भन्ते बी सुमेध बोधी यांनी आशिर्वाद देऊन वर्षावास महामंगलमय पर्वाचा समारोह मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी शेकडो महिला पुरुष उपस्थीत होते.

