उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक (सुरगाणा):- आज दिनांक २५ ऑक्टोंबर रोजी मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक त्यांच्याकडून विविध वस्तूंचे वाटप दिवाळी हा सण भारतात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय मिळवतो.ह्या सणाचे महत्त्व म्हणजे प्रभू श्रीराम वनवासातून परत आल्यानंतर केलेला आनंदोत्सव. या दिवशी त्यांच्या स्वागतासाठी सर्व भारतभर दिव्यांची आरास करून गोड गोड पदार्थ बनवून प्रभू श्रीरामांचे स्वागत करण्यात आले. म्हणून हा भव्य सण म्हणजे दिव्यांचा सण भारतात दिवाळी म्हणून साजरा होतो. असे मत मा.विजय कानडे सुरगाणा आणि मनु मानसी संस्थेच्या अध्यक्षा सौ मेघा राजेश शिंपी यांनी व्यक्त केले.
दिवाळी या सणाच्या निमित्ताने मनु मानसी संस्थेच्या वतीने सुरगाणा मधील विविध पाड्या वरील १०० महिलांना साडी, पणती , फराळ देण्यात आले. तसेच लहान मुलींना फ्रॉक, ब्लँकेट आणि चिक्कीचे वाटप केले.तसेच पाच गरजू बांधव यांना शर्ट पँट पीस देण्यात आले.मोठ्या मुलींना ड्रेस आणि हार सेट देण्यात आले. मनु मानसी संस्था नेहमी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, महिलांचे सबलीकरण अनाथ आश्रम, वृद्ध आश्रम, शाळा आणि विविध पाड्या वरील महिलांसाठी, गाव खेड्या वरील गरजू महिलांसाठी कार्य करते. मनु मानसी संस्थेच्या अध्यक्षा सौ मेघा राजेश शिंपी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या उपस्थित पदाधिकारी मिरा आवारे, रुपाली कोठुळे, यमुना लिंगायत, कविता गायके, साई गायके, विशाखा खैरनार, सुरेखा आहेर, सुनिता आद्यप्रभु, युवराज कोठूळे,सुरेखा घोलप, मीनल सोनवणे, सुरेखा मैड, जयश्री वाझट, वैशाली खाचने, जया बुरुंगे, शिंदेताई यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मनु मानसी संस्थेच्या वतीने सुरगाणा येथील विजय कानडे दादा, शेंवता वळवी, ज्ञानेश्वर कराटे, प्रकाश वळवी, माधव वाघमारे, माधव गवळी, बाळा भोये, गोकुळ भोये यांचा सत्कार करण्यात आला. या सर्व मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले.मनु मानसी संस्थेच्या अध्यक्षा सौ. मेघा शिंपी यांनी तेथील महिलांसोबत सवांद साधला. तेंव्हा त्या महिलांच्या आणि तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद मनाला स्पर्श करून गेला.या सर्व महिलांमध्ये प्रेमाची आणि आपुलकीची भावना जास्त प्रमाणात जाणवली.तेंव्हा वाटले की आपण जे कार्य करत आहोत ते योग्य आहे. कारण त्यांचे लाख मोलाचे आशीर्वाद खूप मूल्यवान आणि आमच्यासाठी दिवाळीची भेट होती.
यावेळी मनु मानसी संस्थेच्या अध्यक्षा सौ मेघा शिंपी, रुपाली कोठुळे, कविता पाटील, मिरा आवारे, जागृती चग, विनया नागरे, धनश्री गायधनी, उमा परदेशी, भारती जाधव, वैशाली गुंडे, वैशाली भागवत, रचना चिंतावर, यमुना लिंगायत, रुपाली वालझडे, सुरेखा घोलप, सुनिता पाठक, विशाखा खैरनार, सरला सागरमोती, गायत्री आसवरे स्नेहल कोठावळे, निलिमा पुरकर, कविता गायके, मीनल सोनवणे, माधुरी तांदळे, सुरेखा आहेर, धनश्री गायधनी, कविता बाविस्कर, दिप्ती कर्देल, विद्या शहाणे, प्रतिमा पैठणकर, जयश्री वाझट, तनुजा गुळवी, सुरेखा मैड, प्रगती भोरे, छाया कोठावदे,हेमलता वानखेडे, मधुरा बेडेकर, सिमा वैद्य, सुनिता आद्यप्रभू, वैष्णवी पाटील, जया बुरुंगे, शिंदे वहिनी, शारदा निपुंगे, आरती सोनवणे यांचे विषेश सहकार्य लाभले. मनु मानसी संस्थेच्या वतीने या सर्व मैत्रीणीना आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

