प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- गोरगरीब बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, त्यांच्या आनंदात आपण सहभागी व्हावे या उदात्त हेतूने अंबिका सोशल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष अंबिका सोशल फाउंडेशन अंबिका हिंगमीरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज रवा साखर वाटप केले.
आज पहिला टप्पा पार पडला यामध्ये बोरगाव मेघे, हनुमान नगर, सिद्धार्थ नगर, नागसेन नगर येथील घरोघरी जाऊन गोरगरीब, अपंग, निराधार, कामगार बांधवांना रवा साखरेचे वाटप केले. आपण समाजाचे देणे लागतो त्यामुळे समाजासाठी प्रामाणिक आणि निस्वार्थपणे कार्य पार पडावे यासाठी मी आणि अंबिका सोशल फाउंडेशन कार्यरत असते. आज पहिला टप्पा पार पडला असून उद्या उर्वरित परिसरात दुसरा टप्पा पार पडेल अशी माहिती अध्यक्ष, अंबिका सोशल फाउंडेशन अंबिका हिंगमीरे यांनी दिली आहे.

