*माणसांची गर्दीत हरपाला*
*गरीब बहिणीचा भाऊ…,,*
*सांग न…र दादा तुल मी,,*
*कोणती पत्तावर भेटवाल येऊ…!!*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
*तु कामात होसींन दादा…*
*दोन शब्द बोली लेता त काय जाता!!*
*माह्या बी मन हलका हुईजाता भाऊ…!!*
*नको र दादा भाबीची हातात असा*
*फोन नको देत जाऊ…!!*
*तु शिवाय कोण ह दादा*
*लाचार बहिणीचा भाऊ…*
*रोज नेंद्वाल खेतात जातांन*
*तुल कस मी हाताचं फोड दाऊ!*
*लय याद इयाली माल ह आज…*
*”ब” अन “बापुची”…!!*
*दादा तुल मी कशी र समजावू!*
*दादा तुच होता र..माहे,,*
*लाड पूरा करणारा…*
*तु मोठा नौकर होला म्हणून,,*
*गरीब बहिणीची तुल ऍलर्जी*
*होली का…र…भाऊ…!!*
*साळी चोई नको लेऊ…*
*पोर्र्हा विचारत राहत्या हती*
*”ब “आपण मामा ची घर*
*कव्हा जाऊ…*
*सांग न र दादा तुल मी*
*कोणती पत्तावर भेटवाल येऊ…*
*आज बि.राज लिख्याला ह*
*बहिणीची खरी आत्मकथा*
*तोच ह माह्या मानेल भाऊ…*
*निरोप लेत जाजो दादा माह्या*
*माल तुह्या पत्ता देजो र भाऊ!!*
*कवी_________________*
*बि.राज तडवी*
*नायगावकर*
*मो.9359795719*

