शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यांचे स्वप्न पूर्ण करणार.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघात जोरदार लढत बघायला मिळत आहे. उत्तर नागपूर परिसरातील अनेक भाग आज पण विकासापासून वंचित असल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. नितीन राऊत यांना ही निवडणूक जड जाणार अशी चर्चा रंगली आहे. त्यात उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघात अतुलकुमार खोब्रागडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघात प्रचाराला जोर वाढला आहे. त्यात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारीने सभा, भेटी, रॅली काढून जनाधार मिळावा म्हणून मतदार राज्याच्या दरबारात हजरी लावत आहे. त्यात अपक्ष उमेदवार अतुलकुमार खोब्रागडे यांनी पण जोरदार प्रचार सुरू केला आहे.
अपक्ष उमेदवार अतुलकुमार खोब्रागडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी दाखविलेल्या शिक्षणाच्या वाटेवर चालून समाजाने प्रगतीचे अनेक शिखर गाठली. अनेकांचे शिक्षण हे सरकारी शाळांमधूनच झालेले आहे. आजही 70 – 80% लोकांची आर्थिक परिस्थिती अशी नाही की खाजगी शाळेत मुलांचे शिक्षण करु शकतात. अशात सरकारी शाळा हेच एकमेव माध्यम आहे. आज उत्तर नागपूरात अगदी बोटावर मोजण्या इतपत सरकारी शाळा राहिल्या आहेत. या शाळांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. रंग गेलेल्या कुबट भिंती, शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नाही. गेल्या चाळीस वर्षांपासून सत्तेत असलेल्यांनी शाळेच्या नावावर आपल्या मुलांना आजारी पाडणारी व्यवस्था उभी केलेली आहे.
मी तुम्हाला विश्वास देतो की उत्तर नागपूर मधील सरकारी शाळांना सर्वोत्तम करणार. आपल्या मुलांना चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल याची मी जबाबदारी घेतो अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र संदेश न्युज ला अतुलकुमार खोब्रागडे यांनी दिली आहे.

